कर्ण खरा कोण होता??


दाजी पणशीकर ह्यांचे अतिशय अभ्यासपूर्ण असे हे पुस्तक. काही कादंब‍र्‍या, ऐतिहासिक पुस्तके ह्यामधे महाभारतात वर्णित कर्णापेक्षा एक वेगळाच कर्ण समोर आणला जातो.. एक अनावश्यक उदात्तीकरण अन सहानुभूती ह्यामुळे कर्णाचे खरे स्वरुप कुठेतरी मागे पडले.. अन फक्त कुंतीच्या एक निर्णयामुळे सूतपुत्र म्हणून ओळखल्या जाणा‌‌‍र्‍या कर्णाबद्दल सहानुभूती निर्माण होते. त्यानंतर अंगावरील कवचकुंडल उदारपणे देणारा कर्ण समोर आणला जातो, मग मित्रत्वाच्या अन उपकाराच्या ओझ्याने दबलेला अन म्हणून दुष्टकर्मात सहभागी झालेला कर्ण अशा पुस्तकातून समोर येतो.. द्रौपदीच्या उपहासात्मक हसण्याने अपमानित झालेला कर्णही आपल्याला दिसतो, अर्जुनाएवढाच कर्णही पराक्रमी होता असेही सांगितले जाते.. पण मग प्रश्न येतो की हे एवढेच त्याचे खरे स्वरुप आहे?? कर्णाचे हे रुप खरे की महाभारतात व्यासांनी वर्णन केलेलं रुप खरे?? ह्या प्रश्नाचे उत्तर ’कर्ण खरा कोण होता’ ह्या पुस्तकात ब-याच अंशी सापडते..

कर्ण सूतपुत्र म्हणून प्रथम जगासमोर आला असला तरी तो अनाथ म्हणून नक्कीच मोठा झाला नव्हता.. एका चांगल्या घरात, सुसंस्कारित मात्यापित्यांचे निरतिशय प्रेम मिळुनच त्याचे संगोपन झाले. कर्ण जर उदार होता तर मग कवचकुंडल दान म्हणून देताना बदल्यात इंद्राकडून प्रभावी अस्त्र का मागून घेतले? दान हे निरिच्छ भावनेने केले जाते.. इथे आपल्याला असे वाचायला मिळते की इंद्राने प्रसन्न होऊन वर दिला.. पण खरेच हे असेच झाले का? की मूळ इतिहास काही वेगळा आहे?

कर्ण खरेच अर्जुनाहून पराक्रमी होता का? मग एकदाही त्याने अर्जुनाचा पराभव कसा केला नाही? प्रत्येक युद्धात अर्जुनाकडून त्याचा पराभवच झाला आहे.. एका प्रसंगात तर अनेक फुशारक्या मारुन पराभावाने लज्जीत होऊन रणांगणातून पसार व्हावं लागले..

कर्ण खरेच जर सद्गुणांचा पुतळा होता तर स्वतः भगवान कृष्णांनी अर्जुनाचा पक्ष का घेतला? कृष्णाने गीतेतही हे स्पष्ट केलेय की धर्माच्या रक्षणासाठी अन साधूंच्या परित्राणासाठी मी अवतार घेतो. मग असे असताना कर्णाचा पक्ष का नाकारला.. इथेच स्पष्ट होते की कर्णाचे जे रुप समोर आणले जातेय ते अनावश्यक उदात्तीकरण आहे.. खरा इतिहास खुप वेगळा आहे..

खरेतर प्रत्येकाने आवर्जून वाचावं असे हे पुस्तक आहे.. ह्या पुस्तकातील सगळे भाग इथे देणं शक्य नाही.. पण काही भाग जमेल तसे इथे देत जाईन.. इतिहासाचा माग घेण्यात मोलाची मदत होते ह्या पुस्तकाने..

पुस्तकातील काही भाग -

१) महर्षी व्यासांनी महाभारतात कोणत्याही व्यक्तिरेखेचे वर्णन करताना कोणत्याही स्त्री-पुरुषाचे गुणदोष लपविलेले नाहीत. कोणावरही अन्याय केलेला नाही आणि कोणाचा अधिक्षेपही केलेला नाही. धर्मज्ञ धर्मराजाचे चित्र रंगवताना व्यासांची प्रतिमा धर्मराजाचे द्यूताचे व्यसन किती विलक्षण आहे हेही निर्विकारपणे दाखविते आणि धर्मपरायण असलेला भीम दुःशासन मेल्यावरही त्याचं रक्त किती आसुरी आनंदानं प्राशन करतो हेही अलिप्तपणे दर्शवते. म्हणजेच व्यास चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणतात. परंतु वाईटाला मात्र ते ’चांगलं’ म्हणत नाहीत.

………………………………

त्याचा(कर्णाचा) थोरपणा अव्यक्तच का राहिला? कालिदास, भारवी, माघ, हर्ष, शंकराचार्य, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास आणि अगदी अलिकडचे महापुरुष म्हणजे लोकमान्य टिळक, न्या. रानडे, भांडारकर इत्यादींपैकी एकाही प्रज्ञावंताला हा आधुनिकांचा कर्ण का आकृष्ट करु शकला नाही? कर्णाचा पक्ष घ्यावा असं यापैकी एकाही पुरुषोत्तमाला का वाटलं नाही.. यापैकी एकही महात्मा कर्णप्रेमाने हर्षविव्हल का होऊ शकला नाही?

२) कौरव पांडवांबरोबर वृष्णि व अंधक कुळातील युवक, अनेक देशांचे राजकुमार व अधिरथ सूताचा मुलगा कर्ण हे द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकण्यासाठी म्हणून आलेले आहेत(आदिपर्व अ.१३२).

पांडवांविषयी दुर्योधनाला द्वेष वाटणे रक्तदोषामुळे स्वाभाविक आहे हे आपण समजू शकतो; परंतु कर्णाला विद्यार्थीदशेत आपलेच सहकारी असलेले पांडव, विषेशतः अर्जुन, यांचा मत्सर करण्याचे काहीच कारण संभवत नाही. परंतु कर्णाच्या जन्मगत मत्सरी वृत्तीला दुर्योधनाच्या दुष्टवृत्तीचे खतपाणी मिळताच कर्णही सर्वच पांडवांचा आत्यंतिक मत्सर करु लागला आहे.

दुर्योधनं समाश्रित्य सोSवमन्यत पांडवान् || ” (आदिपर्व अ. १३२)

वास्तविक विद्यार्थीदशेत अर्जुनाचा व पांडवांचा कर्णाने द्वेष करावा असा कोणताही कटू प्रसंग या शैक्षणिक काळात या विद्यार्थ्यांत निर्माण झालेला नाही. इतर विद्यार्थ्यांना या द्रोणाच्या विद्यापीठात प्रवेश मिळाला तसाच तो कर्णालाही मिळालेला आहे.(आदिपर्व अ. १३२ श्लोक ११) कर्णाला केवळ प्रवेशच मिळाला पण द्रोणांनी त्याला धनुर्विद्या दिलीच नाही असाही पुरावा नाही. परंतु विद्याग्रहणाच्या बाबतीत व विद्यादात्या सद्गुरुंविषयी जेवढी आस्था आणि निष्ठा अर्जुनाने वेळोवेळी संपादन केली होती तेवढी आस्था व निष्ठा कर्णाने या काळात कधीच दाखवलेली नाही.

३) धनुर्वेदाच्या पाठाला प्रारंभ करण्यापूर्वी आचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करुन त्यांना असे विचारले की ’मुलांनो माझ्याजवळून शस्त्र व अस्त्र विद्यांचे शिक्षण घेतल्यानंतर, माझ्या अंतःकरणातील एक इच्छा पूर्ण कराल ना?’ या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी सर्व उपस्थित विद्यार्थी चूप बसून राहिले. त्या विद्यार्थीवर्गात असलेल्या अर्जुनानेच फक्त आपल्या गुरुंची इच्छा पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापूर्वक आश्वासन दिले.(आदि.१३२)

….. त्याचा अनुल्लेख करावा इतका तो यःकश्चित वा सामान्य धनुर्धर नव्हता. अकारण तो अर्जुनाशी स्पर्धा करत असल्यामुळे त्यानेही धनुर्विद्येत लक्ष केंद्रित केले असणारच. धनुर्विद्येत अशाधारण नैपुण्य मिळावे या शुद्ध व सात्विक भूमिकेतून दिवसा व रात्रीच्या अंधारातही निष्ठेने व सातत्याने अभ्यास करणारा अर्जुन व मत्सरग्रस्त भूमिकेतून अर्जुनापेक्षा य विद्येत श्रेष्ठ ठरावे म्हणून जळफळून धनुर्विद्येचा अभ्यास करणारा कर्ण या दोन परस्परांविरुद्ध अशा वेगळ्या भूमिका आहेत. एकाचे अधिष्ठान आहे निष्ठा व नम्रता, तर दुस-याचे अधिष्ठान आहे द्वेष, असूया, स्पर्धा! 

४) दुष्कृत्यात भागिदारी -

कौरव-पांडवांमध्ये भीम हा अत्यंत बलशाली म्हणून प्रसिद्ध होता. सहाजिकच दुर्योधन भीमाच्या प्रचंड शक्तीमुळे त्याचा मनोमन द्वेष करु लागला. सरळ सामना करुन भीमाचा काटा काढण्याचे सामर्थ्य एकट्या दुर्योधनातच काय पण शंभर कौरवातही नव्हते. त्यामुळे कोणत्याही वाममार्गाने, क्रूरकर्म करुन भीमाला ठार मारण्याचे मनसुबे दुर्योधन रचु लागला. त्यातून भीमाला जहरी सापांचा दंश करणे, तो बेशुद्ध असताना त्याचे हातपाय बांधून त्याला डोहात बुडविणे, त्याला अन्नातून कालकूटासारखे प्राणघातक विष खायला घालणे असले दुष्ट हिंसाचार भीमाचा प्राण घेण्यासाठी दुर्योधनाने भीमावर केलेले आहेत. आणि त्या दुष्कृत्यात दुर्योधनाला दुःशासन, शकुनी यांच्यासह कर्णानेही साहाय्य केल्याचा महाभारताने पुरावा दिला आहे.

 

एवं दुर्योधनः कर्णः शकुनिश्चापि सौबलः।

अनेकैरभ्युपायेस्तां जिघांसन्ति स्म पांडवान्॥ (आदि. अ. १२९)

मोह, ऐश्वर्य आणि लोभबुद्धी यामुळे दुर्योधनाची बुद्धी विकृत झाली व तो पांडवांना पाण्यात पाहू लागला. दुर्योधनाच्या या विकृतीमागे दुष्ट धृतराष्ट्राची अंतःप्रेरणा जशी होती, तशी राज्यलोभाची दूरदृष्टीही होती. त्यामुळे पांडवांविषयीच्या दुर्योधनाच्या द्वेषबुद्धीला काही कारण तरी संभवते परंतु कर्णाच्या पांडवद्वेषाला तसे कोणतेच सबळ कारण महाभारतात सापडत नाही. निदान शस्त्रास्त्रकौशल्य प्रदर्शनात कर्णाने अर्जुनाला द्वंद्वयुद्धाचे आव्हान देईपर्यंत तरी, पांडवांचे व कर्णाचे भांडण वा कलह झाल्याची नोंद महाभारतात नाही किंवा पांडवांचा कर्णाने मनापासून विद्वेष करावा असा कोणताही अपराध पांडवांनी केलेला नाही.तरीही अकारण द्वेष करणारा कर्ण विद्यार्थीदशेपासूनच, दुर्योधनाच्या नादी लागून, पांडवांचाही शत्रू म्हणून विख्यात झाला आहे.

About these ads

28 thoughts on “कर्ण खरा कोण होता??

  1. खरेय, मृत्युंजय वाचताना कर्णाबद्दल अवास्तव सहानुभूती वाटून जाते.. असेही वाटते की कर्णावर फक्त अन्यायच झालाय.. मृत्युंजय वाचताना सधा असाही विचार आपल्या मनात येत नाही की खरेच कर्ण एवढा सद्गुणी असता तर खुद्द भगवंतांनी त्याचा पक्ष नसता का घेतला?? मृत्युंजय केवळ कादंबरी म्हणून चांगली आहे, पण तो खरा इतिहास निश्चितच नाही…

    ’कर्ण खरा कोण होता?’ हे पुस्तक वाचताना अनेक गोष्टी उलगडत जातात.. कर्णाच्या स्वभावाची वेगळी झलक समोर येते…

    • KARNA is agreater than everyone.Why krishan didnot take side of karna bcos he want pandvas live in world arjun ageints karna bcos both are great veer in danush when the exam of all rajputra that time no one take side of karan so he angree on arjun he save pandvas krishan maid plan of murrder of karna ie parhsuram shap to karan if they fight by rules then karna would win

    • Karna Kharach kon hota? He konich sangu shakat nahi asa mala vatate.
      Jar karna vait,ahankari hota tar tyach antim sanskar Kumari bhumivar krushananech kela hota mag to ka?
      Jar karn Arjuna peksha parakrami navta tar Krushanane Bhishama marfat karnache udhat yene ka thambavle?
      Jar Karna Maharathi mhanun Bhishma sobat udhat utarla asta tar uddhch rup paltal ast.
      Mala karna baddal sahanubhuti daya vatat nahi karan veer purush konacha tiraskar sahan karu shaktat pan konachi daya nahi,,,,,,

  2. Karn Kharokharach great hota, karnachya durgunavar prakash taktana, tyachya sadgunana janunbujun andharat teval jate ka? krishan tyachi baju ka ghetali nahi? tychi vegali karane aahet, kranacha aantvidi karishnan ka kela? Rajputra aastana tyane akhand jindangi sutputra mhanoon ka jagala? tyacha koni vichar kela ka? to kumari matechya poti jalmala ha tyacha dosh hota ka?

  3. As far as the story of Great Karna is concerned “Mrutunjaya” is the real life story of Karna Becs he was Suryaputra Mother Kunti ‘s First son suppose to be as great as Arjun.

    ——– Shri Gajanan G. Mhatre

    Sahakar Soc.Panvel 17 june 2011.

  4. कर्ण दुर्योधनाचा खास मित्र होता. तो दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. आपल्याकडे आलेल्या याचकाला तो कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही, अशी त्याची ख्याती होती. प्रतिदिन सकाळी तो स्नानास नदीवर जाई. पाण्यात उतरून सूर्याला अर्घ्य देई. स्नान झाल्यावर परत येत असतांना त्याच्यापुढे जो याचक येई, तो कधीही विन्मुख परत जात नसे.
    एकदा भगवान श्रीकृष्ण अणि अर्जुन गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता कर्णाच्या दानशूरपणाविषयी बोलणे चालू झाले. कृष्णाने कर्णाच्या दानशूरतेचे कौतुक केले. श्रीकृष्ण म्हणाला, ”कर्णाइतकी उदार व्यक्ती दुसरी कुणीही नाही.” या बोलण्याचे अर्जुनाला जरा आश्चर्यच वाटले. अर्जुन म्हणाला, ”श्रीकृष्णा, धर्मराजही दानशूर आहे.” सर्वांत अधिक दानशूर कोण आहे ? यावर मग त्यांची चर्चा चालू झाली. श्रीकृष्ण नेहमीप्रमाणेच याही गोष्टीची प्रचीती आणून देण्यासाठी सिद्ध होता. श्रीकृष्ण म्हणाला, ”ठीक आहे, उद्याच आपण धर्मराज आणि कर्ण दोघांकडे जाऊन या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावून टाकू.”
    पावसाळयाचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी उजाडताच श्रीकृष्ण आणि अर्जुन धर्मराजाकडे गेले. धर्मराजाला आनंद झाला. त्याने त्या दोघांचे स्वागत केले. त्यांच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ”राजधानीत एक महत्त्वाचे बांधकाम अचानक करावयाचे आहे. त्यासाठी लाकडे हवी आहेत.” धर्मराजाने आपल्या सेवकांना बोलावले आणि बांधकामासाठी उत्तम प्रतीचे लाकूड आणण्याची आज्ञा केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बराच वेळ झाला, तरी सेवक काही परतले नाहीत. बऱ्याच वेळाने सेवक परत आले, तेही खाली मान घालून. धर्मराज म्हणाला, ”काय झाले ? लाकडे मिळाली नाहीत का ?” सगळीकडे पाऊस पडत असल्याने सारी लाकडे भिजलेलीी होती आणि त्यामुळे सेवक लाकडे आणू शकले नव्हते. नाईलाजाने धर्मराजाने अर्जुन आणि श्रीकृष्णाला लाकडे न मिळाल्याचे कारण सांगितले. श्रीकृष्ण आणि अर्जुन परत फिरले.
    त्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्णाकडे येण्यास सांगितले. त्याच्याकडे गेल्यावर कर्णाने त्यांना आदराने आसनावर बसवले. त्यांचे क्षेमकुशल विचारले. त्यावर अर्जुनाने लाकडांची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले. कर्ण म्हणाला, “एवढेच ना, मग त्यात एवढी चिंता करण्यासारखे काय आहे ?” असे म्हणून त्याने आपल्या सेवकांना लाकडे आणण्यासाठी पाठवले. थोड्या वेळाने परत आलेले सेवक त्याला म्हणाले की, पावसाच्या पाण्याने सारी लाकडे ओली झाल्याने लाकडे मिळू शकली नाहीत. सेवकांचे बोलणे ऐकताक्षणी कर्ण आत गेला. बराच वेळ होऊनही कर्ण बाहेर येत नाही, असे पाहून अर्जुन श्रीकृष्णाकडे बघायला लागला. श्रीकृष्ण त्याला समवेत घेऊन कर्णाच्या दालनात गेला. बघतो तर काय, कर्ण आपल्या पलंगाचे पाय कापत होता. आजूबाजूला इतर लाकडी सामान तोडून ठेवलेले होते. आता त्यांना कर्णाला वेळ का लागला, याचे कारण उमगले. अर्जुनाने विचारले, ”कर्णा, एवढ्यासाठी तू तुझे चंदनाचे कलात्मक लाकडी पलंग कशाला तोडलेस ?” त्यावर कर्ण उद्गारला, ” या वस्तू काय पुन्हा बनवता येतील; पण कुणाला आपल्याला काही देण्याची वेळ यावी आणि आपण तो क्षण गमवावा, यासारखे दु:ख कोणते असेल ?”
    पुढे याच कर्णाने आपली वरदान मिळालेली अंगभूत कवचकुंडलेही दान केली आणि आपल्या त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण इतिहासात ठेवले.

  5. कर्ण खरेच जर सद्गुणांचा पुतळा होता तर स्वतः भगवान कृष्णांनी अर्जुनाचा पक्ष का घेतला? कृष्णाने गीतेतही हे स्पष्ट केलेय की धर्माच्या रक्षणासाठी अन साधूंच्या परित्राणासाठी मी अवतार घेतो. मग असे असताना कर्णाचा पक्ष का नाकारला.. इथेच स्पष्ट होते की कर्णाचे जे रुप समोर आणले जातेय ते अनावश्यक उदात्तीकरण आहे.. खरा इतिहास खुप वेगळा आहे..

    हे अपुन नमूद केले आहे पण
    महाभारतात दुर्योधनं कृष्णाकडून त्याचे सेन्य मागितले होते व अर्जुनाने कृष्णाला आमच्या बाजूने तू ये असे म्हंटले होते कर्ण स्व :ता गेला नाह्वता
    आपण मृत्युंजय वाचली नाही मनापासून
    कर्ण सर्वगुण संपण होता
    अगराज कर्ण जयतु !!

  6. कर्ण खरोखर शूरवीर आणि दानशूर होता
    त्यांनी दिलेले कुंतीला वचन तुझे 5 पांडव जिवंत राहतील ते वचन त्याने युधात ते पाळले होते
    युधात नियम आहे कि निशास्त्रावर वार कार्यच नाही मंग कर्णवर का केला??

    कर्णमुले दुर्योधनं अजय होता दुर्योधनंने कर्णच्या जीवावर युधाला पांडवांना आव्हान देले कारण एकठा कर्ण ५ पांडवा समान होता
    इंद्राला कवचकुंडल दान दिली या पेक्षा दानशूरपानाचे दुसरे उदहरण काय??

    जर कर्ण, अहंकारी होता तर त्याच अंतिम संस्कार कुमारी भूमीवर कृष्णाने केला होता मग तो का ?
    जर कर्ण अर्जुना पेक्षा पराक्रमी नवता तर कृष्णाने भीष्म मार्फत कर्णाचे युधात येणे का थांबवले ?
    जर कर्ण महारथी म्हणून भीष्म सोबत उधात उतरला असता तर उद्ध्च रूप पलटल असते.
    कर्ण बद्दल सहानुभूती दया वाटत नाही कारण वीर पुरुष कोणाचा तिरस्कार सहन करू शकतात पण कोणाची दया नाही

    • मित्रांनो, कर्ण जर सद्गुणाचा पुतळा होता, तर मग द्रौपदी वस्त्र हरणा वेळी शांत का बसला. अंगदेश चा राजा केला म्हणजे दुर्योधना ला प्रत्येक दुष्कर्मा मध्ये सहाय्य
      करायचे का ? कर्ण हा कुरुवंशाच्या सारथ्याच्या घरी वाढलेला होता. तो सारथी सरळमार्गी सुसंस्कारी गृहस्थ असल्यामुळे कर्णावर चांगलेच संस्कार झाले असणार.
      पण तरीही कर्ण पाण्डवद्वेष्टा निघाला, आणि शौर्य तर त्याच्याकडे काडीचे नव्हते. एकट्या भीमाकडून तो ३५ वेळा पराभूत झाला. पण दर वेळी भीमाने त्याला जीवदान दिले. कारण कर्णाचा वध करीन अशी अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती ती मोडली जाऊ नये म्हणून भीम संयम पळत होता. सगळे द्रोण पर्वच या भीमपराक्रमाने आणि कर्ण पराभवाने भरले आहे. लक्षात घ्यावे कि द्रोण पर्व किंवा महाभारतच व्यासांनी रचले आहे. ज्यांनी संपूर्ण महाभारत घडताना पहिले. त्यांनी लिहिलेले खोटे आणि आजच्या काही लेखकांनी केलेला कल्पना विलास खरा असे मानायचे का? या कर्णाला भिमापेक्षाही बलवान व पराक्रमी मानला जात आहे. हि सुद्धा खोटी वल्गनाच आहे.
      जो कर्ण आयुष्यात कधी कोणा माणसाशी देखील बाहुयुद्ध (जी खऱ्या बलवानाची ओळख असते ) खेळला नाही, गदायुद्ध केले नाही तो भिमापेक्षा बलवान होय? ज्या भीमाने मानव तर सोडाच दैत्य-राक्षसांशी बाहुयुद्ध केले. त्यांना लोळविले, महाबली जरासंध ज्याच्या वाट्याला भीष्म देखील गेले नव्हते. तो जरासंध भीमाने बाहुयुद्धातच संपवला. आणि तो संपताच कर्ण आणि सुशर्मा हे दोघे मित्र निघाले जरासंधाचे राज्य बळकावायला ! म्हणजे सिंहाने रेड्याची शिकार करावी आणि कोल्हया -कुत्र्याने यावे आयते लचके तोडायला! जरासंध जिवंत असताना हिम्मत नाही झाली. आता हि आयती संधी म्हणून निघाले राज्य गडप करायला पण पोपटच झाला त्यांचा. कारण श्रीकृष्णा ने लगेच कर्णाला निरोप धाडला ‘ असे काही कराल तर यादव सेनेशी गाठ आहे’. हिम्मत असती तर यादवसेने शी भिडून कर्णाने
      जरासंधाचे मगध जिंकले असते पण तसे न करता तो माघारी फिरला आणि शांत असा दुर्योधना शेजारी जाऊन बसला. आहा रे शूरवीर!

  7. Karn ha Arjuna pekshach kay tr sarv Pandavan Peksha Mahan ani Shakti shali hota,tyane ektyane 4 dishana Digvijay Milavla hota.asa motha Digvijay Arjunala milala navhta, tasech Shree Krushana ne Karna chi baju ghenyacha prashnach nahi bcz Yuddha he Shree Krushnanech ghadavle hote,tyasathich tyane Avtar ghetla hota.ani te Yudha (Kaurav ani Pandav) ya doghan Madhle hote te pan Satte vrun,Karn ani Pandav yan madhle navhate.ani Karn ha kahi Swatacha RajyaBhishek honya sathi Ladhat navhta. ani Mahabhartat jar Arjun sarvat shreshth asta tr tyane (Shikhandi) la Dhal Banvun Bhishma cha Vadh kela nasta.

  8. Ajunparyant kunihi he pustak vachun kinva mahabharat vachun reply nahi dila. ithe adhikansh lokanvar phakta “mrutyunjay” cha prabhav disatoy. kadambari ani itihas hyat nehamich pharak asato. “karna khara kon hota” hya pustakat mahabharatatale sandarbh spashta dilele aahet. te pratyek jan paDatalun pahu shakato. pan tevadhihi tasadi kuni ghetali nahiye. aapalyala vastav swikaranyapeksha kadambarila khare manayche asel tar kunachich tyala kahi harakat nahi. pan tyamule itihas badalat nahi. shevati ha jyachya tyachya vachanacha an vicharancha bhag aahe.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s