विठ्ठला तू वेडा कुंभार
विठ्ठला, तू वेडा कुंभार
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार ॥ धृ. ॥
माती, पाणी, उजेड, वारा,
तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार ॥ १ ॥
घटाघटाचे रूप आगळे,
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविणा ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार ॥ २ ॥
तूच घडवीसी, तूच फोडीसी,
कुरवाळिसी तू, तूच ताडीसी
न कळे यातून काय जोडिसी
देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार ॥ ३ ॥
– गीतकार – ग. दि. माडगुळकर
– गायक – सुधीर फडके
(नितांत सुंदर असे हे गाणे आहे.. कितीही निराश मनस्थिती असली तरी हे गाणे ऐकताना पुन्हा नवा उत्साह, नवी प्रेरणा मिळते.. मन आपोआप शांत होते… हे गाणे सैरभैर मनस्थितीत पुन्हा पुन्हा ऐकत राहावेसे वाटते.. एक आठवण म्हणून नेहमी समोर असावे, ह्यासाठी ब्लॉगवरच ठेवतेय..)

हे गाणं वाचून एकायची इच्छा झाली आणि मी ते एकुनच इथे प्रतिकिया देत आहे, खरचं हे खुप अर्थपुर्ण गाणं आहे आणि त्यात बाबुंजीचं संगीत, वाह वाह !
असंच एक गाणं आहे मा़झ आवडतं..”विठू माउली तु माउली जगाची..” ते ही खुप छान आहे.
धन्यवाद !
-अजय
Ajay
सप्टेंबर 23, 2009 at 15:25
Sarv gani sundar aahet.
vivek phutane
मार्च 9, 2010 at 18:02
khupach chhan,download cha speed khupach kami ahe
purn gane akayanasathi 15 min lagatat,tarisudha maza ali
sanjay gugle
जानेवारी 22, 2011 at 07:36
Medha Ji
khup chan lihal ahe
khup changlya goshti vachayla milaya
Thank You
Sushma Bhintade,Bhuinj
sushma
मार्च 10, 2011 at 07:24
eka geetatun jeevanacha art ulghdto
jalindar
जानेवारी 12, 2012 at 07:05