RSS

आवडलेली पुस्तके अन लेखक

लहानपणी घरात असलेली पुस्तके पाहून मनात वाचनाची आवड निर्माण झालीच, पण घरातल्या वातावरणामुळे ती जोपासलीही गेली.. त्यामुळे अनेक चांगल्या पुस्तकंचा खजिना घरीच उपलब्ध झाला.. नवीन नवीन पुस्तकांचा फडशा पाडणे हे अजूनही तेवढ्याच आवडीने चालु आहे.. त्यातली काही पुस्तके नेहमी आठवणीत राहावीत म्हणून इथे एकत्र ठेवाविशी वाटली.. तसेच सगळ्यांकडून ह्या यादीत भर पडून मला नवीन पुस्तकांची माहिती मिळत राहील हा ह्या पानाचा प्रामाणिक उद्देश…. जमेल तसे ही यादी अपडेट करत राहीन..

१. दुर्दम्य – गंगाधर गाडगीळ (लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांचे चरित्र..)

२. हात ना पसरू कधी – रविंद्र पिंगे (स्वतः अपंग असून अन्य अपंग व्यक्तींना हाताशी धरुन एक कारखाना चालवणा-या व्यक्तीबद्दचे पुस्तक..)

३. समिधा – साधना आमटे

yayati४. ययाती – वि. स. खांडेकर

५. अमृतवेल – वि. स. खांडेकर

६. क्रौंचवध – वि. स. खांडेकर

७. एक होता कार्व्हर – वीणा गवाणकर

८. अल्बर्ट श्वाईट्झर – सुमती क्षेत्रमाडे (आफ्रिकेच्या जंगलात निग्रोंसाठी आपले अवघे आयुष्य वेचणा-या डॉक्टरचे चरित्र..)

९. शांतिब्रह्म – लीला गोळे (संत एकनाथ ह्यांच्या चरित्रावर आधारित पुस्तक..)

१०. माझा साक्षात्कारी ह्रदयरोग – डॉ. अभय बंग

११. हृदयस्थ – डॉ. अलका मांडके

१२. नॉट विदाउट माय डॉटर – बेट्टी महमूदी

mahanayak१३. महानायक – विश्वास पाटील
(नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्यावर अतिशय अभ्यासपूर्ण असे पुस्तक..)

१४. नेताजी – वि. स. वाळिंबे (नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांचे अभ्यासपूर्ण चरित्र..)

१५. कर्ण खरा कोण होता – दाजी पणशीकर (मृत्युंजय वाचून मनात निर्माण होणारी कर्णाबद्दलची खोटी सहानुभूती नाहीशी करणारे अन इतिहासातले नेमके संदर्भ देऊन सत्य मांडण्याचा प्रयत्न करणारे पुस्तक..)

१६. कॅंसर माझा सांगाती – डॉक्टर बावडेकर

१७. युद्धनेतृत्व – दि. वि. गोखले

१८. चाकाची खुर्ची – नसीमा हुजरुक (एका आजारामुळे आलेल्या अपंगत्वाने खचून न जाता त्यावर मात करुन इतर अपंग व्यक्तींसाठी संस्था चालवणा-या स्त्रीचे आत्मचरित्र..)

karyarat१९. कार्यरत – अनिल अवचट
(झपाटून जाऊन समाजसेवेत कार्यरत असलेल्या ध्येयवेड्यांची ओळख करुन देणारे हे पुस्तक..)

२०. प्रश्न अन प्रश्न – अनिल अवचट

२१. माणूस – अनिल अवचट (हे पुस्तक ठरवूनही पूर्ण वाचून झाले नाही.. अशा भयंकर समस्या अन त्यातही जगणा-या माणसांच्या विश्वात शिरताना डोळ्यातले पाणी थांबत नही..)

२२. अज्ञाताचे विज्ञान – सुरेशचंद्र नाडकर्णी (अध्यात्म अन विज्ञान ह्यावर प्रयोग अन संदर्भासह माहिती देणारे पुस्तक)

२३. साद देती हिमशिखरे (Towards the silver crest of himalaya) – जि. के. प्रधान

२४. तपस्या – सुमति क्षेत्रमाडे (अतिशय अप्रतिम कादंबरी आहे ही.. प्रत्येकाने एकदा आवर्जून वाचावी अशी..)

२५. जगज्जेते – संजय ओक (आज जे मोठे मोठे उद्योगपती म्हणून नावाजले गेले आहेत अशांची एक वेगळीच ओळख करुन देणारे पुस्तक.. McDonald, coke अशा अनेक कंपनीची सुरुवात अन जडणघडण कशी झाली ह्याची रंजक माहिती ह्या पुस्तकात आहे..)

२६. tottochanतोत्तोचान – मूळ लेखक तेत्सुको कुरोयानागी,
मराठी अनुवाद – चेतना गोसावी
जपानी निरागस लहान मुलीच्या शाळेतल्या गमतीजमती, तिचे हेडमास्तर.. त्या शाळेचे वेगळेपण हे की तिथे लहान मुलांचे बालपण जपत, त्यांच्या आवडीनिवडी समजून घेत तिथले हेडमास्तर मुलांची जडणघडण करत.. रेल्वेच्या डब्याचा वापर शाळेचे वर्ग भरवण्यासारखी भन्नात कल्पना अजून काय असावी… अन अशा शाळेत जाऊन शिकायला, दंगा मस्ती करायला कुणाला नाही आव्डणार.. पण त्याचबरोबर सगळ्या मुलांच्या वागणुकीवर मुख्याध्यापकांचे तेवढेच बारीक लक्ष होते… प्रत्येकाने एकदा आवर्जून वाचावेच असे पुस्तक आहे…

२७. माझी जन्मठेप – स्वा. वि. दा. सावरकर

Advertisements
 

10 responses to “आवडलेली पुस्तके अन लेखक

 1. NILESH MISAL

  सप्टेंबर 10, 2009 at 18:05

  VA PHARACH CHAN APLYA PUSTANKAN PAIKI BARICH MAZI HI PUSTAKE AVDICHI AHET BAR VATL DR ASUN VACHAN LEKHAN KAVYA VA ITS BEYOND OF WORD

   
 2. Dr Digvijay Patil

  सप्टेंबर 20, 2009 at 11:18

  i like your wide reading hobbyes and your poetryes and broad mindness

   
 3. leena

  ऑक्टोबर 9, 2009 at 05:39

  तोत्तोचान : he book me shalet asatana wachale ahe.Amchya baini khas wikat gheun sagalyana wachayala lawala hota wargat…
  Khup sunder pustak ahe… Relwechya dabbyatil shala atishay sunder ahe..

   
 4. anil rathod

  नोव्हेंबर 14, 2009 at 15:46

  नमस्कार, आपल्या सर्वांचे इथे मनपूर्वक स्वागत! हा ब्लॉग प्रपंच एवढ्यासाठीच कि आपण कधी कधी असे काहीतरी वाचतो जे मनाचा ठाव घेऊन जाते, विचार करावयाला लावते स्वताकडे या जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलवण्यास भाग पाडते असे काही मी वाचलेले आपल्यासारख्या वाचकांसाठी उपलब्ध करून द्यावे म्हणूनच तसेच कधी काही सुचले आणि लिहावे असे वाटले तर ते आपल्यासमोर मांडण्याचा आणि आपला अभिप्राय जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी!
  जय हिंद, जय महाराष्ट्र!

   
 5. प्रणव

  जानेवारी 13, 2010 at 10:09

  डॉक्टर, छान blog आहे. तुम्ही एक एक करून आवडलेल्या पुस्तकांचा थोडक्यात परिचय करून दिलात तर हा ब्लॉग अजून अर्थपूर्ण होईल. तपस्या ह्या पुस्तकाबद्दल मला काही माहिती मिळाली नाही, जमल्यास किमान त्या कादंबरीचा परिचय करून द्यावा. धन्यवाद.

   
 6. Sachin Noraje

  मार्च 17, 2010 at 14:05

  Thank you, I got a list of books which gave me inspiration to read them.

   
  • kishor

   मार्च 2, 2011 at 09:12

   aajun chhan pustakachi nond aasavi manun kali kahi nav deto
   1) chhava – shivaji sawant
   2) shriman yogi – ranjit desai
   3) sambhaji – vishwas patil
   4) lakshaved – ranjit desai

    
   • ankursuresh

    एप्रिल 12, 2011 at 10:55

    do you have the pdf scribed copy of “saad deti himashikhare” & its second part as “antaricha magova” i want it for reading. or if it is possible could you tell me where i will get these books.

    regds.

    ankur s.

     
 7. Raghav Desai

  ऑक्टोबर 11, 2011 at 09:12

  where can i get ‘saad deti himashikhare’ book copy? wch prakashan?

   
 8. Archana V

  डिसेंबर 28, 2013 at 03:59

  very nice,actually i was thinking of reading something from many days and at the same time i came across ur blog.this information is very helpful to me.thank you very much.

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: