RSS

आवडलेले चित्रपट

१. सैल ( ३ च ठळक व्यक्तिरेखा.. अन तरीही केवळ अभिनय अन संवादांच्या जोरावर अन्य व्यक्तिरेखांचे चित्रपटात ’असणे’ जाणवून जाते… मोहन जोशी अन रिमा लागू यांचा उत्कृष्ट अभिनय अन एका भीषण वास्तवाचे संयत चित्रण ह्यासाठी हा चित्रपट लक्षात राहतो..)

२. निशाणी डावा अंगठा ( एकापेक्षा एक वरचढ कलाकार, दर्जेदार कथानक, विनोदी अंगाने समोर येणारे एक वेगळेच वास्तव.. खेडेगाव, सरकारी कामकाज पद्धती, गरीब बिचारे शिक्षक अशा टप्प्यांवर निखळ हसवून जाणारा अन हसवता हसवताच आपले डोळे खाडकन उघडून जाणारा चित्रपट..)

३. नितळ ( अनेक आजारांबाबत समाजाची भूमिका आजही बदलली नाही ह्याची जाणीव करुन देणारा चित्रपट.. विज्ञान पुढे गेलेय पण आपण माणसं तेवढीच मागे आहोत हे तेवढ्याच प्रकर्षाने जाणवते.. अन ही परिस्थिती गावातली नाही तर शहरातली आहे, जिथे सुशिक्षीत समाज राहतो…)

४. Sliding Doors ( केवळ एका क्षणाचे अस्तित्व असलेली घटना एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात किती महत्वाची असते.. केवळ १ क्षण… अगदी रेल्वेचे दार बंद होऊन ती पकडता न येणे, ह्यासारखी वरवर क्षुल्लक वाटणारी घटना पण आयुष्यात किती उत्पात माजवू शकते ह्याचे खुप सुंदर अन बोलके चित्रण ह्यात आहे.. प्रत्येकाने आवर्जून पहावा असा चित्रपट..)

५. Life is beautiful ( एक ज्यू लहान मुलगा अन त्याचे वडील ह्यांच्यातले एक निखळ नाते ह्यात दिसते, ते पण दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर.. ज्यूंसाठी हिटलरने उभारलेल्या छावणीत कैद होण्याची वेळ ह्या कुटुंबावर येते.. त्या छावणीतून मुलाला अन पत्नीला सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना वडील मुलाल हलक्याफुलक्या मूडमधे कायम ठेवतात.. एकीकडे मृत्यू अन दुसरीकडे सुटकेसाठी जीवानिशी धडपड अशा अवस्था अंगावर काटा आणते… भावनिक नात्याचा हा पैलु अनुभवण्यासाठी तरी हा चित्रपट नक्की पहावा असा आहे…)

६. एक उनाड दिवस ( अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट… सेट असे रुटीन आयुष्य काटेकोरपणे जगत असलेल्या माणसाच्या आयुष्यात एक वेगळा दिवस उजाडतो, ज्यामुळे त्याचे जगणेच बदलून जाते.. )

७. वास्तुपुरुष ( एक वाडा अन त्यात राहणा-या माणसांचे भिन्न स्वभाव, कुणाला गुप्त धन हवेय तर कुणी असहकार चळवळीत काम केल्याने विरक्तीत जगणारे.. अन ह्या सगळ्यातून केवळ आईच्या तीव्र इच्छेपोटी डॉक्टर होणारा नायक… तो वाडा, आईचे स्वप्न अन बाकी सगळ्या व्यक्तिरेखांचे बारकावे अतिशय सुंदर टिपले आहेत ह्यात…)

८. चौकट राजा – दिलीप प्रभावळकर, सुलभा देशपांडे, स्मिता तळवलकर, अशोक सराफ़…. एकाहून एक दिग्गज कलाकार.. अन तेवढाच सहज सुंदर अभिनय.. मैत्रीच्या नात्याचे बदलेले पैलु.. एका वेगळ्याच वळणावर नवे प्रश्नचिन्ह घेऊन थांबलेले.. अन पुन्हा एका नव्या दिशेने वाटचाल करणारे.. डोळे अन मन एवढे भरुन जाते की पुन्हा पहाण्याची तयारी होत नाही, एवढे वास्तव पचवायची तयारी होत नाही… काळजात रुतून बसणारा हा चित्रपट…

Advertisements
 

2 responses to “आवडलेले चित्रपट

 1. Aparna

  ऑक्टोबर 1, 2009 at 14:44

  sail picture mala khara sangte nahi aawadala…mhanaje jara ek dusara tok watale…ani mainly the way they have shown facts about their kids….anyway….

   
 2. pritam

  नोव्हेंबर 18, 2011 at 11:24

  जोगवा
  दे धका
  मोरया
  झेंडा
  विहीर
  त्या रात्री पाउस होता
  सुंभरान
  पराध
  नटरंग
  रानभूल
  मुंबई पुणे मुंबई
  वळू
  टिंग्या
  श्वास
  पक पक पकाक
  मांडला दोन घडीचा डाव
  गुलदस्ता
  गैर
  निशाणी दावा अनाग्ठा
  आणखी भरपूर …………………

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

 
%d bloggers like this: