RSS

मौक्तिक – भावार्थ

03 ऑगस्ट

मौक्तिक पहिल्या कडव्यात त्या समुद्रपक्षाची विलक्षण आत्मशक्ती आहे की जेवढं उंच उंच जाऊ तेवढीच खाली समुद्रात येण्याची मज्जा किंवा समुद्रात बुडी मारण्याचे अलौकिक सुख पदरी पडणार आहे… (समुद्रपक्षाला निसर्गतःच उंच जाण्याचे वरदान प्राप्त आहे पण त्याहीपेक्षा समुद्राच्या खोलीचा ध्यास घेण्यासाठी त्याला त्याच्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा वेगळी वाट चोखंदळायची आहे) माणसांच्या बाबतीत ही वेगळ्या वाटेने जाण्याची प्रवृत्ती फार कमी वेळा दिसुन येते…

दुस-या कडव्यात निव्वळ व्यवहारिकपणा आहे… जेव्हा अशी वेगळी वाट चोखंदळण्याचा प्रयत्न होतो तेव्हाच ह्या जगाचा व्यवहारिकपणा जाणवू लागतो… अशा प्रयत्नात जगातील बहुसंख्य लोकांची भूमिका ही गणितीय असते, केवळ अपेक्षित यश वा नफा मिळवण्याची.. किंवा सारे काही भौतिक नफ्यातोट्याच्या तराजूत तोलण्याची..

तिस-या कडव्यात सांगायचे आहे कि कधी कधी आपण अगदी रेतीप्रमाणे त्या नियतीच्या हातातील प्यादे होतो.. म्हणजे जसे रेतीला तिचा आकार गवसलेला आहे, तिला इतरांच्या (जगातील व्यवहारिक लोकांच्या) कल्पनांचाच आकार स्वतःला घेताना पाहणे क्रमप्राप्त असते.. अन मग त्या आकारात ’घडण्याचा’ जणु शाप वाटु लागतो..

अशा वेगळ्या मार्गावर वाटचाल करताना आज ना उद्या आपण गांजले जाण्याचीही शक्यता गृहीत धरलेलीच असते.. अशावेळी त्या गांजण्याचा विचार करत राहून स्वतःतील चांगला भागही समाजाला का देता येऊ नये, त्या दूषित नदीसारखाच जिला लोकांनी दूषित केल्यानंतरही ती वाहातच राहाते अन आपल्यातील चांगला भाग लोकांना देतच राहाते…

क्षितीज म्हणजे मीलनाची सुरुवात.. नभाच्या धरेवरील प्रेमाच्या तरल भावनेचा असीम बिंदू… पण त्यातील भावना, नभातील प्रेरणा देणारे ते चंद्र सूर्य पहायचे की नभातली तांत्रिकता शोधत रहायचं हेही आपल्यावरच! (भावना की व्यवहारवाद) इथे हे क्षितीज आपल्या ध्येयप्राप्तीचा परमोच्चबिंदू असाही अर्थ घेता येतो….

मृत्यू हा अनिवार्य आहेच पण त्याचे भय वाटून जगणे का सोडता येते? तसेच एखादी गोष्ट (ध्येय वा यश) संपणार म्हणून तिचा पाठपुरावा करणे नाही ना थांबवता येत… एखादी गोष्ट जरी भौतिक स्वरुपात संपली तरी त्यातल्या मौलिक, मौक्तिक अशा कितीतरी अभौतिक गोष्टी मागे रहातातच…’मरण’ या गोष्टीचे भय बाळगण्यापेक्षाही त्याचे अस्तित्व स्वीकारुन वागले तर या काळालाही मुठीत पकडता येते… प्रत्येक क्षण अन क्षण सुवर्णांकित करता येतो मौक्तिक करता येतो..

 

टॅग्स:

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: