RSS

स्वाईन फ्लु – वेगळा विचार

12 ऑगस्ट

“सदर लेख सकाळमधील पैलतीर ह्या सेक्शनमधे प्रकाशित झाला आहे, ही त्याची लिंक –
(श्री सम्राट फडणीस ह्यांचे आभार हा लेख निवडल्याबद्दल..)”
—————————————————————————————————————————————
मी इथे युके मधे आहे, इथे ह्या रोगावर उपाय करण्यासाठी रुग्णाला घरापासूनही पूर्ण वेगळे केले जाते.. बरे होईपर्यंत घरच्यांना भेटायचेदेखील नाही…

हा उपाय भारतात किती बरोबर आहे?? नीट विचार करुया..

इथे लहानपणापासून मुलांना इंडीपेंडंट वाढवले जाते.. त्यांची आई वडील किंवा भावंडं ह्यांच्याशी attachment नसतेच.. त्यामुळे ते मूल वेगळे केल्यावरही वेगळ्या मनोभूमिकेत जात नाही.. तर तेवढेच comfirtable असते…

आपण लहानपणापासून आई वडील भाऊ बहिण अशा सर्वांशी attach असतो.. घरातील एखाद्या मुला अशा आजारात पूर्ण आयसोलेट केले अन आई वडीलांना किंवा कुणालाच ६-७ दिवस भेटु दिले नाही तर ते मूल खरेच लवकर बरे होईल का?? आज मुलांच्या किंवा रुग्णांच्या मानसिकतेचा विचार आजारात सगळ्यात जास्त व्हायला हवा.. एक डॉक्टर म्हणून पण असे वाटते की आजारी माणूस केवळ शारीरिक उपायांनी बरा होत नाही.. तर जवळच्या लोकांच्या आधारावर पण एक प्रकारचे मानसिक बळ मिळते त्या आजारातून बाहेर येण्यासाठी…

माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की अगदी गोवर झालेला असताना अंगात १०१ पेक्षा जास्त ताप होता, पण आईचा नुसता चेहरा जरी समोर दिसला तरी ताप उतरायला लागायचा.. कुठलंही antibiotic घेतले नव्हते.. साथीचे रोग त्यावेळीही होते, ते सगळे होऊन गेले पण कधीच antibiotic घ्यायची वेळ नाही आली… अन कुठलेही विपरित परिणामही राहिले नाहीत त्या रोगाचे… शिवाय सगळ्या रोगातून सहीसलामत बाहेर आलो.. अन पुन्हा मनसोक्त मस्ती करायला, खेळायला मोकळे… फक्त आयुर्वेदिक औषध.. अन रात्रभर उशाला बसून राहणारी आई.. तिचा चेहरा पाहतच २-३ दिवसात ठणठणीत बरे होऊन जायचो… अन कितीतरी आजारातून असे बरे झालोय.. तिच्या चेह-यावर एक विश्वास सतत आम्हाला दिसत राहायचा, की लवकरच तू बरी होणार आहेस.. अन तो विश्वास पाहून आतूनच एक वेगळे बळ यायचे..

आपल्या शासनाची चूक आहे हे आपल्याला मान्य करावेच लागेल… कारण शासन हे प्रत्येक गोष्टीत अन्य देशांमधे होणा-या संशोधनावर अवलंबून राहणार…

कधीच असे का होत नाही की भारतात सगळ्यात आधी औषध सापडून ते जगाला पुरवले जाते?? नेहमीच युएस किंवा युके मधे काही उपाय निघाले की मग आम्ही त्याचा अवलंब करणार…

भारतीय हवामान, भारतीय कुटुंब पद्धती, राहणीमान, ह्यावर अवलंबून आपण कधीच संशोधन का करत नाही?? प्रत्येक वेळी सगळे परकीय आहे तसेच फक्त अवलंबत जायचे हे कशासाठी…

 
सार्वजनिक आयुष्यात अगदी बस किंवा ट्रेनमधे पण शेजारी बसलेला TB किंवा अन्य साथीचा आजार असलेला रुग्ण असू शकतो.. फक्त तिथे अज्ञानात सुख असते..

म्हणजे, बस अन इतर परिवहन सेवा बंद करायच्या का?? की त्यातून प्रवास करणे बंद करायचे??

 
आपल्या सरकारची अन त्याच्या कार्यक्षमतेची खरेच कीव वाटते… लस सापडेपर्यंत फक्त हात बांधून गप्प रहायचे का? आज आपल्या देशात अनेक पर्यायी औषधी शास्त्रे उपलब्ध आहेत.. सरकार त्यांच्या मदतीने काही उपाय योजना का शोधू शकत नाही?? आयुर्वेद, होमीओपथी, अशा विविध पद्धतींमधे उपाय आहेत.. पण ते शोधून वापरुन पहाण्याची मुभा शासनाकडून का दिली जात नाही?? ते संशोधन करायला शासन पाठिंबा का देत नाही?? अशी उपाय योजना शोधून जगासमोर आधी का नेली जात नाही?? आपल्याला सवयच लागलीये का दुस-याच्या ओंजळीने पाणी प्यायची??

गेले काही महिने इथे परदेशात हा आजार आहे, पण एकही शाळा बंद नाही करावी लागली की एकही ऑफिस बंद नाही झाले…. अन हे सगळे चालु ठेवल्याने हा आजार फैलावला असेही चित्र नाहीये… परदेशात काही कमी रुग्ण नाही सापडलेत.. अजूनही हा आजार काही प्रमाणात इथे आहे, पण भारतात जी भिती पसरवली जातीये ह्या रोगाबद्दल ती इथे कुठेच नाहीये…

अन आपल्याकडे??? मिडीया माहिती देण्याचे काम नेटाने करण्याऐवजी भितीच जास्त पसरवतेय… लोकांना अशा साथीच्या आजारात धीर देऊन त्यांची भिती कमी करायची की वाढवायची?? घरात बसून राहिल्याने सगळे प्रश्न सुटणार अहेत का? त्यापेक्षा योग्य ती काळजी घेऊन कामावर जाणे अधिक योग्य नाही का? आधीही साथीचे रोग येत होतेच.. अन जेव्हा आलेत तेव्हा लगेच त्याची लस उपलब्ध नव्हतीच.. तरी लोकांमधे ही अशी भिती निर्माण नव्हती केली जात..

 
इतर कुठलेच असे इन्फेक्शीअस रोग नाही आहेत का की ज्यात mortality rate जास्त आहे? टीबीने दररोज किती पेशंट दगावतात ह्याची सांख्यिकी पाहिलीये का कधी? मग त्याबद्दल आपल्या मनात कधी अशी भिती असते का? आपण घरात बसून राहतो का? जर नाही तर फक्त ह्याच वेळी का? कारण लोक मरत आहेत असे समोर येतेय.. पण किती? पुण्याची लोकसंख्या किती?? कोटीच्या घरात असेल… त्यापैकी रुग्ण किती तर १५०.. ह्या १५० पैकी १० दगावले… मग जे बरे होऊन घरी गेले त्यंची माहिती समोर आली का?? सगळेच तर एवढे सिरीअस नाही आहेत ना? त्यातले पण बरे होतच आहेत.. मग ती माहिती देऊन लोकांचा धीर का वाढवला जात नाहीये??
 
चूक कोणाची ह्यावर चर्चा करण्यापेक्षाही झालेल्या चुका कशा टाळता येतील ह्याचा सर्वांगीण विचार झाला पाहिजे.. शासनाकडून जे काही होणार असेल त्याची वाट पाहण्याऐवजी आपण जे जे करु शकतो ते आधी करायला हवे.. अन्य उपचार पद्धतींबद्दलची साशंकता मनातून काढली पाहिजे… जर योग्य उपाय असतील तर कुठल्याही पद्धतीकडे खुल्या मनाने जाऊन ते स्वीकारले पाहिजेत.. एका उपचार पद्धतीने सध्या शक्य नसेल तर २-३ उपचार पद्धतीचा अवलंब डॉक्टरी सल्ल्याने करायला हवा….
 
अजूनही वेळ गेलेली नाही.. पुढचे रुग्ण सुखरुप वाचु शकतात ह्यादृष्टीने जे होईल ते करणे हे प्रत्येकाचे काम आहे, जबाबदारी आहे.. मला काय त्याचे? मी माझ्या घरी सुखात बसून राहील हा विचार काहीकाळ तरी बाजुला ठेऊया.. अन जे जे शक्य आहे त्यात आपण सारे हातभार लावुया….
टीप – ह्या रोगावरील आयुर्वेदिक उपचाराबद्दल आज सकाळमधे एका ज्येष्ठ वैद्यांचे मत आलेय त्याची ही लिंक,
 

4 responses to “स्वाईन फ्लु – वेगळा विचार

 1. Nandkumar Palkar

  ऑगस्ट 13, 2009 at 10:33

  Fantastic thoughts! Our Government and all of us need to act on it. Now this a high time.
  Thanks Medhaji! (Ashi kan ughadani karana far garajecha aahe!)

   
 2. ngadre

  ऑगस्ट 13, 2009 at 10:56

  Great writeup. Just one thought: They are isolating patients from home to avoid spread.

  In Indian setting that poor mother will also get flu.

   
 3. Samrat Phadnis

  ऑगस्ट 13, 2009 at 13:34

  मी फेसबूकवर ही पोस्ट वाचली. खूप चांगली आहे. ई सकाळवर वापरायची आहे. वापरण्यासंदर्भात आपला होकार कळवावा. माझा ई मेल samrat.phadnis@esakal.com किंवा samaphadnis@gmail.com

   
 4. GKPurandare(UK)

  ऑगस्ट 14, 2009 at 09:51

  Atishay uttam ,udbodhak vichar sukshama,sajag nirikhanatun mandli aahet.Chhan. Phadnisana ‘yes’kalvale aselach.nasel tar kalav.

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: