RSS

कर्मयोग २ (अर्जुनविषाद – ५)

18 ऑगस्ट

कर्म आपल्याकडून होणार आहे किंवा केले जाणार आहे.. करायचे की नाही हा पर्याय आपल्याला दिलेला नाहीये.. तर ते जाणीवेतून करायचे की नेणीवेतून हा मुद्दा बाकी ठेवलाय..

 हे कर्म मी करत नसून, माझ्याकडे असलेल्या प्रकृतिजात गुणांमुळे ते माझ्याकडून करवून घेतले जात आहे.. त्यामुळे, करणारा मी नाही अन म्हणून त्याचे फलही मला नको, ते त्या विधात्याच्या चरणी अर्पण. ही भावना मनात रुजणे, ठसणे म्हणजेच जाणीव. त्या विध्यात्याच्या सार्वभौमत्वाची जाणीव.. त्या ईश्वरी शक्तीच्या असण्याची जाणीव..

 एखादे लहान मूल सुरुवातीला पाटीवर अक्षर काढायला शिकत असते तेव्हा आईचा किंवा वडिलांचा हात त्या मुलाच्या हातावर असतो.. मुलाचा हात आपल्या हातात धरुन ते त्याल एक एक अक्षर काढायला शिकवत असतात….. आधी त्या छोट्या मुलाला वाटते की मीच हे अक्षर काढले, अन त्या आनंदात ते मूल सगळ्यांना ती पाटी दाखवते.. पण पुढच्याच वेळी जेव्हा आईचा किंवा वडिलांचा हात त्या मुलाच्या हाताभोवती नसतो, अन ते मूल एकटेच अक्षर काढू लागते, त्यावेळी त्याला जाणवते महत्व त्या दुसर्‍या हाताचे.. आपल्याला अक्षर काढायला शिकवणार्‍या हाताचे..

 आपलेही काहीसे असेच होते का? त्या लहन मुलाला ती जाणीव तरी येते की तो हात होता म्हणून आपण हे पहिले अक्षर काढू शकलो.. आपण अहंकाराच्या भ्रमात ही जाणीवही विसरुन जातो का? आपल्याला ह्या जगात पहिल्यांदा खर्‍या अर्थाने ‘जगायला’ कुणी शिकवले? कुणी इथवर आणले?? अन इथून पुढे कोण नेतंय?

 ते लहान मूल नेणीवेतून सगळ्यांना ती पाटी दाखवत असते.. आपण एवढे मोठे होऊनही त्याच्यासारखेच वागत असतो का?? फरक एवढाच की ते मूल खरेच लहान, अजाण, निरागस असते.. अन आपण?? आपण सारे काही समजून, उमजूनही कर्तेपणाच्या भूमिकेतून अजिबात बाहेर येऊ शकत नाही.. अन तरी आपले हे असे जगाला पाटी दाखवताना तो परमेश्वरही आईच्या किंवा वडिलांच्या मायेने आपल्याला जवळ ठेवत असतो..

 न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌ ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जैगुणैः ॥ ३-५ ॥
(भगवद्गीता अ. ३)

 अर्थ -निःसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभरसुद्धा काम न करता राहात नाही. कारण सर्व मनुष्यसमुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो..

 अगदी सरळ शब्दात, स्पष्टपणे भगवंतांनी सांगितले आहे की, प्रकृतीने दिलेल्या गुणांमुळे आपण पराधीन आहोत.. कर्म न करता आपण राहू शकत नही.. एकतर इच्छेने ते कर्म करायचे किंवा अनिच्छेने.. पण ते कर्म आपल्याकडून करवले जाणार हे निश्चित…

 इथे मुद्दा येतो, जाणीव अन नेणीव यांचा.. जाणीव घेऊन केले तर कर्मफलाचा नाश होतो.. म्हणजे ते फल आपल्याला चिकटत नाही.. आपण त्या फलापासून व पर्यायाने कर्मापासून मुक्त होतो. अन नेणीवेतून म्हणजे ‘मी कर्ता’ ह्या भूमिकेतून करत राहिलो तर त्या कर्मात तर आपण बांधले जातोच अन त्याच्या फलातही…

कठीण वाटते ना, जाणीवेतून कर्म करायला?? त्यापेक्षा नेणीवेत आहोत (अज्ञानात आहोत) ते जास्त बरे असे वाटून जाते ना.. अन आपल्या शरीरातही अशी अनेक कर्मे आपल्या नकळत निरंतर चालु असतातच ना.. आपल्याही नकळत जर श्वास घेतला जातो, आपल्याही नकळत जर अन्न पचते, तर मग काय गरज आहे जाणीवेची?? आहे हे असेच राहिले तर कुठे बिघडले?? पण कल्पना करा की एक दिवस पचन नीट नाही झाले तर?? घशात काहीतरी अडकून जोरात ठसका येऊन कधी श्वास कोंडला तर?? त्याक्षणी जाणवते ना महत्व.. त्या पचन करण्यार्‍या घटकांचे, त्या श्वास घेणाच्या प्रक्रियेचे… मग प्रश्न अस येतो की, खरेच हे महत्व फक्त अशाच वेळी, अशाच प्रसंगी जाणवले पाहिजे का?? आजवर ज्या प्रक्रियांनी आपले आयुष्य खर्‍या अर्थाने ‘आयुष्य’ म्हणून जपले त्यांच्याबद्दल योग्य ती जाणीव आपण ठेवायला नको?? नेहमी काही बिघाड झाला, कुठे काही कुरकुर सुरु झाली की मग त्याचे महत्व आपल्याला पटणार, जाणवणार…

हेच आपले परमेश्वाराबाबतही घडतंय का?? आजवर सारे सुरळीत सुरु आहे म्हणून जाणवत नाही का त्याचे असणे?? अन जेव्हा कुठेतरी काहीतरी बिघडते तेव्हा मग धावा सुरु होतो… एखाद क्षण श्वास कोंडल्यावर जशी आपली खरी धावपळ सुरु होते श्वास घ्याला.. तसे एखाद क्षण जगण्याच्या स्मूथ रस्त्यावर एखादा मोठा अडथळा आला, अन आपले सारे शर्थीचे प्रयत्नही संपले, त्याक्षणी मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे परमेश्वराचे स्मरण…

कधीतरी उलट करुन बघुया का?? जेव्हा सारे व्यवस्थित सुरु आहे तेव्हा त्या परमेश्वराचे स्मरण ठेऊया का?? कठिण तर काहीच नाही.. फक्त काम सुरु करताना त्याचे स्मरण झाले अन कर्तेपण त्याच्या चरणी सोपवले की झाले.. मग जे काही व्हायचे असेल ते सांभाळायला अन त्यातून पार करुन न्यायला तो आहेच की…

ॐ तत् सत् कृष्णार्पणमस्तु ||

 

टॅग्स:

One response to “कर्मयोग २ (अर्जुनविषाद – ५)

 1. SNN

  ऑगस्ट 19, 2009 at 12:42

  MEdha:
  Nice way or simplified expalanation. Some questions in my mind :
  What exactly happens on mental, intellectual or spiritual level if the Karma is done through Janeev. How to verify whether the Janeev is true or not? Even by the honest person. What mechanism results within which confirms the true Janeev? Whether by Janeev or Neneev, the karma occurs e.g breathing, then what differnce takes place in my living life. In both cases the life continues. Those karma, I think has got nothing to do with your satisfaction or gratitude. They will go on till end of your life. Do these karmas, if done through Neneev increase the ego? Or will it be considered as increase in Aasuri Sampatti? The child does everything through Adnyan. But still he enjoys? From Within? What is this innocence then? HE does not understand the types of Karma and still it enjoys? All saints also behave in such childlike innocence. Why so? What is meant by burden of Karma? What is Sahajata? So much confusion in my mind, isnt it? Pl forgive for such adnyan on my part!

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: