RSS

तुळस माझ्या अंगणाची – भावार्थ

27 ऑगस्ट

tulsi_worshipप्रसादची मूळ कविता –

बोलल्यावाचूनही उमगले जे सर्व काही वाटले ,
नयन तुझे ते बोलले जे माझ्या मनी दाटले !
स्पर्शातुनी तुझ्या रोमांच अंगी माझ्या उमटले ,
नक्षत्रांचे देणे आले कुठुनी अन् कोठले !

उदार तुझ्या शपथा अन् त्यावर सर्वस्वी हा जीव वाहिला ,
पिंजर्यातील जीव माझा मुळी माझाच न राहिला !
भेट तुझी घडणार नाही , ठाउक आहे मला मुळी ,
येशील मात्र स्वनात माझ्या ही आशा नाही खुळी !

जुळलेल्या सर्व तारा , खनक तुझ्या पैंजणाची ,
किणकिणते कानात माझ्या , रुणझुण तुझ्या कंगणाची !
मिळूनही सर्व सारे , वेळ वाटे मागण्याची ,
सोबतीस साद घाले , तुळस माझ्या अंगणाची !

भावार्थ –

ह्या कवितेत मला भूतकाळ अन वर्तमान काळ ह्यांचे द्वंद्व जाणवते.. पहिले अन तिसरे कडवे हे भूतकाळातील स्मृतींशी निगडीत तर दुसर्‍या कडव्यात वर्तामानातील वास्तवाचा स्वीकार.. कुठलाही त्रागा न करता केलेल स्वीकार..

ह्या आधी म्हटल्याप्रमाणे तुळस हे मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतिक आहे.. तशीच एखादी व्यक्ती, तिच्या सगळ्या आठवणींसह, प्रत्येक निर्णयासह तेवढीच पवित्र, उत्साहाचे, मंगलमयी अस्तित्व घेऊन आपल्या आयुष्यात असते…

पहिले कडवे – एका अनामिक हुरहुरीने मन काहीसे अस्वस्थ असावं अन अशा बेसावध क्षणी हृदयाच्या तळाशी असलेल्या किंवा दडवून ठेवलेल्या आठवणी आपल्याही नकळत स्मराव्यात, ही अवस्था ह्या ओळीत जाणवते.. अन भूतकाळातील त्या स्मृती आजही जाणीवेतून अवतीभवती वावरत आहेत असे वाटून जाते.. अन क्षणभर संभ्रमी होते हे मन, की ह्या खरेच केवळ आठवणी आहेत का.. की आज आत्ता घडलेली घटना.. अन मग काही क्षणातच मन भानावर येते..

दुसरे कडवे – जिथे ह्या दुसर्‍या कडव्यात व्यक्त झलेला वर्तमानकाळ समोर ठाकतो.. अजूनही आठवणीतून मन पूर्णपणे बाहेर नाही आलेय.. संध्यासमयच जसा.. ना वास्तवाची दुपार, ना भूतकाळाची गडद गहिरी रात्र.. हुरहुर लावणारे हे क्षण…

ह्या कडव्यात ‘पिंजर्‍यातील जीव’ असा शब्द आला आहे.. पिंजर्‍यात आपण अडकले गेलो आहोत ह्याचे पूर्ण भान त्या जीवाला आहे.. तो पिंजरा कसला आहे, अन हा जीव त्या पिंजर्‍यात कसा अडकला ह्याचीही पुरेपुर जाणीव आहे.. जर ही जाणीव नसती तर पुढचे शब्द (माझा मुळी माझाच न राहिला) नसते आले.. ती पुढच्या शब्दात आलेली हतबलताच सांगून जाते की पिंजरा अन त्यात कैद होणे, तिथपर्यंतचा प्रवास हे सारे भान अजूनही कायम आहे… अन हे असे भान असूनही एक आशा मनी कायम आहे.. अन ती ह्यामुळेही असेल की, जी ‘तुळस’ आहे तिच्यावरचा विश्वास… आज काहीशी विलगता आली असेल तर ती केवळ ह्या मधल्या पिंजर्‍यामुळे आली आहे, ह्याचीही जाणीव आहे.. अन हा पिंजरा आज ना उद्या सुटणार किंवा आपल्यात तेवढे बळ येणार की ज्याच्या आधारे हा पिंजरा तोडता येणार..

तिसरे कडवे – अन मग जुळलेल्या तारा, पैंजणांची खनक, ह्या आठवणी मग सकारात्मकतेतून येतात.. आधीची निराशा पार झटकली जाते.. भूतकाळ एका नव्या उमेदीने पुन्हा वर्तमानातात आणावा असे वाटते.. अन ह्यासाठी गरज आहे ती त्या तुळशीच्या अस्तिस्त्वाची.. अन ह्या पिंजर्‍याचे बंध तुटणार अन ह्यातून सुटका होणार हे उमजल्यावर त्या पवित्र, मंगलमयी ‘तुळशीची’ साद खर्‍या अर्थाने ‘ऐकू’ येते.. त्या तुळशीकडे मागितलेल्या मागणीच्या पूर्ततेची साद….

 

टॅग्स: ,

One response to “तुळस माझ्या अंगणाची – भावार्थ

  1. Swati

    डिसेंबर 5, 2009 at 06:11

    Swati :Mazya Manala Farch Bhavali,Khupach Sunder Kavita ahe

     

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: