RSS

घळई – भावार्थ

28 ऑगस्ट

ghalai

घळई.. आपण स्वतः.. काहीसे खोल त्या घळईसारखेच.. वरुन बघितले तर केवळ त्या घळईची हिरवाई दिसते (दाखवली जाते…).. पण थोडेसे खाली म्हणजे आत गेल्यावर एखादे बारीक छिद्रही स्पष्ट दिसते.. म्हणजे जेवढे खोल जावे तेवढे ते छिद्र अधिक स्पष्ट दिसत जाते.. (स्वतःच शोध असाच घेत गेले तर हे छिद्र सापडू शकते..) इथे छिद्र हे केवळ कमतरता वा उणीव दाखवण्याच्या दृष्टीने वापरलेला शब्द नाही.. एखादी आत दडवून ठेवलेली अन कधीतरी नकोशी वाटणारी गोष्ट असाही अर्थ घेता येतो.. एखादी गोष्ट जी खालच्या पाताळाचे दर्शन करुन देते ती कधीकधी (मनाच्या विशिष्ट अवस्थेत) नकोशी होऊ शकते.. म्हणून आपण हीच गोष्ट लपवायला जतो.. हे छिद्र वरवर पाहिल्यास कुणालाच सापडत नाही..

ह्या छिद्रातून खाली (आत) पाहिल्यास एक पाताळ सापडते.. पातळ म्हणजे, अशी एक गोष्ट जी कुणीही नाही पाहिली पण जिचे अस्तित्व सर्वमान्य आहे, अन तरीही त्याचे स्वरुप नकोशा गोष्टी खोल गाडण्याचे मानले गेलेय..

आवाजाचे प्रतिभ्रम.. म्हणजे आपल्या आत चालू असलेली खळबळ.. एकाच वेळी जुन्या नव्याचा पडताळा होत असताना काय चूक काय बरोबर हे ठरत असताना होणारी एक वेगळी घालमेल किंवा विचारांचे माजलेले रान..

इथे अजून एक वेगळी गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे एखादी गोष्ट ‘छिद्र’ आहे ही जाणीव प्रसंगानुरुप वा काळानुरुप बदलते.. (ऋतुमेघांची दुलई- प्रत्येक ऋतुनुसार बदलते भाव.. म्हणजे, वर्षा ऋतूत हिरवीगार वाटलेली घळई ग्रीष्मात पूर्ण रुक्ष, कोरडी, ओसाड वाटते.) अन काळानुरुप बदललेल्या संदर्भात ते छिद्र आहे की बलस्थान ह्याचा संभ्रमही गुडूप झालाय..

अन हे छिद्र भूतकाळात कदाचित सौंदर्यस्थळ ठरलेलेही असू शकते.. (वर्तमानात संदर्भ बदलल्याने ती गोष्ट छिद्रासमान वाटतीये.)

ह्या पाताळात दडलेली ही गोष्ट नवीन घबाड / नवीन उद्रेक ठरु शकते.. कदाचित त्या लाव्ह्याला बाहेर येण्यासाठी..

अन शेवटच्या २ ओळींचे २ अर्थ,

लाव्हा आत दाबूनही बाहेरुन ती घळई सर्व शांत असल्याचे भासवत असेल, किंवा आतला लाव्हा बाहेर अल्यावरच खर्‍या अर्थाने ती घळई शांत होत असेल..

 

टॅग्स: ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: